IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात पावसानं एन्ट्री केलीय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पावसाला सुरुवात झाली आणि सामना तूर्तास थांबवण्यात आलाय. भारतानं एकही विकेट्स न गमावता 22 धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवननं 8 चेंडूत 2 तर, शुभमन गिलनं 21 चेंडूत 19 धावा केल्या आहेत.


ट्वीट-






 


हॅमिल्टन येथील हवामान
हवामान विभागाच्या अंदाजानुसार हॅमिल्टनमध्ये रविवारी दुपारी सुमारे चार तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडच्या वेळेनुसार, हॅमिल्टनमध्ये दुपारी एक वाजल्यापासून ढगाळ वातावरण राहिल. तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असेल. यानंतर संध्याकाळी सात वाजता आणि रात्री नऊ वाजता पुन्हा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. 


पावसामुळं टीम इंडियाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या सामना भारतानं जिंकला आणि तिसरा सामना पावसामुळं बरोबरोत सुटला. एकदिवसीय मालिकेतही तसेच काही चित्र पाहायला मिळत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा सात विकेट्सनं पराभव केला. महत्वाचं म्हणजे, हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळल्या जात असलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर शेवटचा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर, मालिका बरोबरीत सुटेल. जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसानं गोंधळ घातल्यास मालिका न्यूझीलंडच्या नावावर होईल. 


भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.


न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.


हे देखील वाचा-