India vs Ireland T20I: भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरोधात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघात पदार्पण झालेय. दरम्यान, भारताच्या टी 20 क्रिकेटच्या इतिहासात जसप्रीत बुमराह पहिलाच कर्णधार आहे, जो गोलंदाज आहे. याआधीचे सर्व कर्णधार फलंदाज अथवा अष्टपैलू खेळाडू राहिलेत.


भारताची प्लेईंग 11 -


ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा


Ireland Playing 11 :


पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हैरी टेक्टर, कर्टिस कैम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅक्कार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटिल आणि बेंजामिन व्हाइट. 






भारत आणि आयर्लंड मालिका वेळापत्रक



भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे. 


रिंकू-बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष - 


1 – जसप्रीत बुमराह


जसप्रीत बुमराहने वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. आशिया चषक आणि विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराहची कामगिरी भारतीय संघासाठी महत्वाची आहे. आज बुरराह कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बुमराह भारतीय संघाची धुराही सांभाळत आहे. त्यामुळे पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहच्या फिटनेसवर सर्वांच्या नजरा असतील. अशा स्थितीत तो मैदानावर कोणत्या वेगाने गोलंदाजी करतो हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 


3 – रिंकू सिंह


रिंकू सिंह याचे आज पदार्पण होण्याची शक्यता आहे. रिंकू सिंह याने आयपीएलमध्ये सलग पाच षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. आयर्लंड दौऱ्यात रिंकू सिंह कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात रिंकू याने धावांचा पाऊस पाडला होता. आज संधी मिळाल्यास रिंकू कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.