IND Vs ENG Test Series : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर 25 वर्षीय शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका ही गिलची कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका आहे. त्यामुळे इंग्लंडला जाण्याआधी कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी (5 जून) मुंबईत पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की, संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) काही कसोटी सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. संघ व्यवस्थापनाने अद्याप त्याला कोणत्या सामन्यांमध्ये विश्रांती द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही. गंभीर म्हणाला, "आम्ही अद्याप त्याला कोणत्या तीन सामन्यांमध्ये खेळवायचे हे ठरवलेले नाही."
गंभीर म्हणाला की, संघाला बुमराहची उणीव भासेल पण त्याने उर्वरित भारतीय गोलंदाजांवर विश्वास व्यक्त केला की ते त्याची जागा भरून काढू शकतात. त्याच्या अनुपस्थितीची भरपाई करून ते टीम इंडियासाठी सामने जिंकू शकतात.
गंभीर म्हणाला, "पाहा, जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूची जागा घेणे नेहमीच कठीण असते, परंतु आमच्याकडे खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. मी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आधी सांगितले होते की, यामुळे दुसऱ्याला त्यांची क्षमता दाखविण्याची संधी मिळते आणि आमच्याकडे पुरेशी प्रतिभा आहे. मला माहित आहे की तो एक दर्जेदार गोलंदाज आहे, परंतु आमच्याकडे संघात पुरेशी गुणवत्ता आहे."
बुमराह व्यतिरिक्त, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, शार्दुल ठाकूर आणि आकाश दीप हे इंग्लंड मालिकेसाठी भारताच्या वेगवान गोलंदाजीचा भाग आहेत आणि नितीश कुमार रेड्डी वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू असतील. गंभीरच्या मते, बुमराहच्या खेळण्याचा क्रम मालिकेत भारत कोणत्या स्थानावर आहे यावर अवलंबून असेल.
भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ (Indian Test squad for England tour)
कर्णधार : शुभमन गिलउपकर्णधार आणि विकेटकीपर : ऋषभ पंतफलंदाज : यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डीऑलराउंडर : रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूरगोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादवविकेटकीपर : ध्रुव जुरेल
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक - (India vs England Test series schedule)
पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्सदुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅमतिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडनचौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन