Ind Vs ENG Test Series 2025 : विराट कोहली (Virat Kohli) आणि एम.एस. धोनी (MS Dhoni) यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा भारतीय क्रिकेट संघ कधीच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही, यावरून लक्षात येते की, शुभमन गिल (Shubman Gill) आणि संघासाठी इंग्लंडमध्ये होणारी कसोटी मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्यातच विराट कोहलीसह रोहित शर्मानेही (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे या नव्या संघावर अधिकच दबाव असणार आहे. 

Continues below advertisement

भारतीय क्रिकेट संघाने 1971 साली इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली. तेव्हा भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये इतिहास रचू इच्छिते. तथापि, याआधी भारतीय संघ तब्बल 19 वेळा कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आला आहे. यापैकी भारताने फक्त 3 वेळा मालिका जिंकली आहे.  

इंग्लंडविरुद्ध भारताने 2007 साली जिंकली होती कसोटी मालिका 

२००७ साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेला पटौदी ट्रॉफी असे नाव देण्यात आले होते. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेली ही पहिली मालिका होती, जी भारताने 1-0 ने जिंकली. यानंतर, भारताने इंग्लंडमध्ये चार वेळा कसोटी मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी तीन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि एकदा मालिका अनिर्णित राहिली आहे.

Continues below advertisement

2011 आणि 2014 साली भारताने इंग्लंड दौरा केला तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. पण दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 2011 मध्ये पटौदी ट्रॉफीमध्ये इंग्लंडने भारताचा 4-0 असा पराभव केला. 2014 मध्ये इंग्लंडने 5 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 आणि 2022 मध्ये इंग्लंडचा दौरा केला. 2018  मध्ये इंग्लंडने भारताचा 4-1 असा पराभव केला. तथापि, 2022 मध्ये भारतीय संघ मालिका बरोबरीत आणण्यात यशस्वी झाला. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत होती.

शुभमन गिल इतिहास रचणार का?

भारतीय संघाने गेल्या 18 वर्षांपासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे करू शकेल का? अर्थात ते शक्य आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे निवृत्त झाले आहेत, परंतु संघात अनेक तरुण खेळाडूंसह अनुभवी खेळाडू देखील आहेत. कर्णधार गिलसोबत करुण नायर, ऋषभ पंत, केएल राहुल यांच्या रूपात चांगले फलंदाज आहेत. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराजसारखे उत्कृष्ट गोलंदाजही आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

20-24 जून (हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड)2-6 जुलै (एजबॅस्टन स्टेडियम)10-14 जुलै (लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड)23-27 जुलै (ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड)31 जुलै-4 ऑगस्ट (ओव्हल)

इंग्लंडविरुद्ध भारताचा कसोटी संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शरद कुमार, मोहम्मद कुमार, शरदराम, बी. कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

आणखी वाचा 

India vs England : शुभमन गिलनं कसोटीत 'या' क्रमांकावर फलंदाजीला यावं, ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचं मोठं वक्तव्य