India vs England लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये दुसरा सराव सामना सुरु आहे. केएल राहुलनं शतक केलं आहे. नॉर्थम्पटन काऊंटी ग्राऊंडवर ही मॅच सुरु आहे. पहिल्या डावात फलंदाजी करतान 168 बॉलमध्ये 116 धावा केल्या. या डावात केएल राहुलनं 15 चौकार आणि 1 षटकार मारला. भारत अ संघासाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलनं डावाची सुरुवात केली. राहुल सलामीला खेळत असल्यानं कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला. केएल राहुलच्या शतकानंतर त्याला इंग्लंड विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. राहुलनं तो या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल दोघे सलामीला आल्यास उजवं डावं समीकरण तयार होऊ शकतं.
हेडिंग्ले टेस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर करुण नायर, साई सुदर्शन किंवा अभिमन्यू ईश्वरन यापैकी एकाला संधी मिळू शकते. करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसून येते. कारण गौतम गंभीरनं त्याचं कौतुक केलं आहे.
शुभमन गिल कितव्या स्थानावर फलंदाजीला येणार?
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंगनं शुभमन गिल जर चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला तर त्याच्यावरील दबाव कमी होईल, असं म्हटलं. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येणं त्याच्यासाठी जोखमीचं ठरु शकतं रिषभ पंत पाचव्या तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येई शकतो. ऑलराऊंडर नितीशकुमार रेड्डी किंवा शार्दूल ठाकूर यापैकी एकाला संधी मिळेल. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा हे तीन वेगवान गोलंदाज संघात असतील. तर कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात असेल.
टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीत चार स्पेसनल फंलदाज, एक विकेटकीर, दोन ऑलराऊंडर, तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज एक फिरकीपटू अशा सूत्रानुसार मैदानावर उतरु शकतात.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, रिषभ पंत (उपकॅप्टन/विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
भारत vs इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक
पहिली कसोटी: 20-24 जून, 2025- हेडिंग्ले, लीड्सदुसरी कसोटी: 2-6 जुलै, 2025- एजबेस्टन, बर्मिंघमतिसरी कसोटी: 10-14 जुलै, 2025- लॉर्ड्स, लंदनचौथी कसोटी: 23-27 जुलै, 2025- ओल्ड ट्रैफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट, 2025- द ओवल, लंडन