INDvsENG 1st Test : चेन्नईच्या चेपॅक मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनने आश्चर्यकारक गोलंदाजी केली. या कसोटीत अश्विनने अशी कामगिरी केली जी गेल्या 100 वर्षांत कोणत्याही फिरकी गोलंदाजाला करता आलेली नाही. अश्विन कसोटी क्रिकेटमधील मागील 100 वर्षात डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे.


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अश्विनने ही विशेष कामगिरी केली. दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला आऊट केले. स्लिपमध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेने त्याची कॅच घेतली. क्रिकेटच्या 134 वर्षांच्या इतिहासातील हा पराक्रम करणारा तो तिसरा फिरकीपटू आहे.


दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर बर्ट व्होगेलारने 1907 मध्ये कसोटी सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा टॉम हेवर्डला बाद केले होता. अशी कामगिरी पहिल्यांदा फिरकीपटू बॉबी पील केली होती. योर्कशायरच्या बॉबी पीलने 1888 मध्ये अ‍ॅशेसमध्ये हा पराक्रम केला होता.


अश्विनला विक्रमाबद्दल माहिती नव्हती


अश्विनला या विक्रमाबद्दल माहिती देखील नव्हती. अश्विन म्हणाला की, जेव्हा मी दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली तेव्हा मला खूप आनंद झाला. पण हे मला माहित नव्हते की तो एक विक्रम आहे. संघ व्यवस्थापनाने मला सांगितले की हे शंभर वर्षांत प्रथमच घडलं आहे. मी विराटचे आभार मानतो कारण मला माहित आहे की ईशांत गोलंदाजीला सुरुवात करेल पण विराटने मला पहिली ओव्हर दिली.


अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. अश्विन पहिल्या डावात 146 धावा देऊन तीन गडी बाद करण्यास यशस्वी झाला तर दुसऱ्या डावात त्याने 61 धावा देऊन 6 विकेट्स घेतले.


संबंधित बातम्या