India vs England : इंग्लंडचा कर्णधार जो रूट 100व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक लगावणारा जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. रूटने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये भारतासोबत जारी पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुहेरी शतक लगावलं. याआधी 100व्या कसोटीत सर्वाधित धावा करण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानचा क्रिकेटर इंजमाम उल हक याच्या नावावर होता. ज्याने भारताच्या विरोधात 2005 मध्ये बंगळुरुमध्ये 184 धावांची खेळी केली होती.


रुटने ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार ठोकत कसोटी सामन्यातील आपलं पाचवं दुहेरी शकत झळकावलं. तो षटकार लावत दुहेरी शतक पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला होता. त्याचसोबत रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू बनला आहे. माजी कर्णधार एलिस्टर कुकच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमध्ये पाच दुहेरी शतक लगावल्याचा विक्रम आहे. तर वेली हामंडच्या नावे सात दुहेरी शतकं आहेत.





रूटने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक ठोकलं होतं आणि तो आपल्या 100व्या कसोटीत शतक लगावणारा पहिला फलंदाज बनला होता. रूटने रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर 100वी धाव गेत आपलं शतक पूर्ण केलं होतं. त्याने 164 चेंडूंवर 12 चौकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं होतं. रूटच्या आधी कॉलिन कॉड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंजमाम-उल-हक, रिकी पॉटिंग, ग्रीम स्मिथ आणि हाशिम अमला यांनी आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक लगावली होती. पॉटिंगने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात आपल्या 100व्या कसोटीत दोन्ही डावांत शतक लगावलं होतं.


त्याचसोबत रूट पहिला असा क्रिकेटर बनला आहे. ज्याने आपल्या 98व्या, 99व्या आणि 100व्या कसोटी सामन्यात शकत लगावलं आहे. रूटच्या कसोटी कारकिर्दीतील 20वं आणि यावर्षातील तिसरं शतक आहे. त्यांनी याआधी दोन शतक श्रीलंका दौऱ्यावर लगावली आहेत.


त्याचसोबत रूट तिसरा असा क्रिकेटर आहे. ज्याने आपली पहिली आणि 100वी कसोटी एकाच देशाच्या संघाविरोधात खेळली आहे. रूटने भारताविरोधात 2012 मध्ये नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. रूटच्या आधी वेस्टइंडिजच्या कार्ल हूपर आणि भारताचे कपिल देव यांनी आपली पहिली आणि 100वी कसोटी एकाच देशाच्या विरोधात खेळली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :