IND vs ENG 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवाबरोबर टीम इंडियाला चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या 22 वर्षांत प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.
टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 337 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी टीम इंडियाचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.
INDvsENG 1st Test : अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' विक्रम करणारा 100 वर्षातील एकमेव फिरकीपटू
36 वर्षांनंतर चेन्नईत टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव
यापूर्वी इंग्लंडने 1985 मध्ये चेन्नईच्या मैदानावर टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर चेपॉकमध्ये दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामने खेळले गेले, पण प्रत्येक वेळी सामना टीम इंडियाने जिंकला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात 2016 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटचा सामना झाला होता. तो सामनाही टीम इंडियाने एक डाव आणि 75 धावांनी जिंकला होता.
22 वर्षांनी चेन्नईत टीम इंडियाचा पराभव
गेल्या 22 वर्षात चेन्नईत टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. याआधी एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाला 1999 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर या मैदानावर टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला नव्हता. पण इंग्लंडने सर्व समीकरणे बदलली आणि मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या फिरकीपटूंना उपयुक्त अशा खेळपट्टीवर टीम इंडियाचा पराभव करणे हे इंग्लंडचं मोठं यश आहे.
Uttarakhand Glacier Collapse: उत्तराखंडमधील आपत्तीमुळे ऋषभ पंत दु:खी; मदतीसाठी पुढे सरसावला