IND vs ENG, 5th Test : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिकेत 2-1 ने आघाडीवर असलेला भारत मालिका जिंकू शकला नाही. मालिका 2-2 ने अनिर्णित सुटली. सामन्यात अखेरच्या डावात भारताने दिलेले 378 धावांचे लक्ष्य इंग्लंडने एका सेशनमध्ये 7 गडी राखून जिंकले. यामध्ये जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांची शतकं फार महत्त्वाची ठरली. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. कसोटी सामन्यातही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचनुसार नाणेफेक इंग्लंडने जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आणि अखेर अप्रतिम खेळाच्या जोरावर सामना देखील जिंकला.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सर्व फलंदाजांची अवस्था खराब झाली होती. 100 च्या आतच निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. पण त्याचवेळी ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या द्वीशतकीय भागिदारीने भारताचा डाव सावरला. दोघांनी शतक ठोकली आणि भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
- त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरुवातीला खराब होत होता. भारतीय गोलंजदाज दमदार गोलंदाजी करत होते. पण तेव्हा जॉनी बेअरस्टोने 106 धावा ठोकत संघाचा डाव सावरला आणि धावसंख्या 284 पर्यंत नेली.
- ज्यानंतर पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. मग दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी केली नाही. पण पंत (57) आणि पुजाराची (66) अर्धशतकं संघासाठी महत्त्वाची ठरली.
- दुसऱ्या डावात भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले होते.
- पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण भारताने संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
- त्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर अॅलेक्स आणि जॅक यांनी दमदार सुरुवात केली. पण अॅलेक्स 56 तर जॅक 46 धावा करुन बाद झाला. नंतर ओली शून्य धावांवर बाद झाला. बुमराहने ऑली आणि जॅकला बाद केलं. तर अॅलेक्स धावचीत झाला.
- त्यानंतर मात्र जो रुट आणि जॉनी यांनी तुफान फटकेबाजी केली. चौथ्या दिवशीच्या अखेरीस जो रुटने 112 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 78 धावा लगावल्या असून जॉनीने 87 चेंडूत 8 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 72 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडचा स्कोर 259 वर तीन बाद होता आणि पाचवा संपूर्ण दिवस हातात असताना त्यांना 119 धावांची गरज विजयासाठी होती.
- ज्यानंतर पाचव्या दिवशी खेळ सुरु होऊन पहिल्याच सेशनमध्ये जो आणि जॉनीने तुफान फटकेबाजी करत आपआपली शतकंही पूर्ण केली आणि संघाला एक तगडा विजयही मिळवून दिला.
- दोन्ही डावात जॉनीने ठोकलेल्या शतकामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
हे देखील वाचा -
- IND Vs ENG : ऋषभ पंतच्या दोन चूकांमुळे टीम इंडियाला झाला मोठा तोटा, वाचा नेमकी चूक कुठे झाली?
- IND Vs ENG: हनुमा विहारीची एक चूक पडली भारी, बेअरस्टोचा झेल सोडला अन् सामनाच फिरला!
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक