IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने आधीच 3-1 ने आघाडी घेतली आहे. आता अखेरचा सामना जिंकून कसोटी मालिका 4-1 जिंकण्याचा निर्धार टीम इंडियाचा असेल तर कसोटी मालिकेचा गोड करण्यासाठी इंग्लंड सज्ज झाली आहे.
पाच कसोटी सामन्याची सुरुवात इंग्लंडने विजयी केली होती. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पलटवार केला. भारतीय संघाने सलग तीन सामन्यात बाजी मारत मालिका खिशात घातली. आता अखेरचा सामना जिंकून WTC मध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
जसप्रती बुमराह संघात परतल्याने भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भारतीय संघ तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. तर आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. कुलदीप यादव अथवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते. फलंदाजीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. केएल राहुल तंदुरुस्त नसल्यामुळे रजत पाटीदार याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. अथवा देवदत्त पड्डीकल पदार्पण करु शकतो. सरफराज खान यानं राजकोट कसोटीत शानदार खेली केली. पम रांची कसोटीमध्ये त्याला अपयश आले. दुसरीकडे यशस्वी जायस्वाल यानं संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याला या मालिकेत 800 धावा करण्याची संधी असेल.
अश्विन-बेयरस्टोचं शतक -
आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो यांचा आज 100 वा कसोटी सामना पार पडणार आहे. भारत आणि इंग्लंड आपल्या खेळाडूंना विजयी भेट देण्यासाठी प्रयत्नशील असतील. यामध्ये कोणता संघ बाजी मारेल? याचीच चर्चा सुरु आहे.
इंग्लंडच्या संघात मार्क वूड परतला -
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन सामन्यानंतर इंग्लंडने रणनिती बदलली. आता इंग्लंड संघ दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरत आहे. धर्मशाला कसोटी सामन्यात मार्क वूड आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजीची धूरा संभाळणार आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टले फिरकीची धुरा संभाळतील. त्यांच्या जोडीला जो रुट असेलच.
खेळपट्टी कशी असेल -
धर्मशालामध्ये तापमान एक डिग्रीपर्यंत आहे. त्यात खेळपट्टी पाटा आहे. धर्मशालाच्या मैदानावर वेगवान गोलंदाजाला मदत मिळण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांचा मोठा वाटा होता.
धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11-
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर
भारताची संभाव्य 11 -
यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
आणखी वाचा :
IND vs ENG: धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 जाहीर, मार्क वूड परतला