IND vs ENG Dharamshala : धर्मशाला येथे होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं प्लेईंग 11 ची घोषणा केली. इंग्लंडच्या ताफ्यात मार्क वूडचं कमबॅक झालेय. तर ओली रॉबिन्सला आराम देण्यात आला आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 3-1 ने आघाडी घेतली आहे. आता अखेरचा कसोटी सामना सात मार्च रोजी धर्मशाला येथे होणार आहे. 


बुधवारी इंग्लंडने प्लेईंग 11 ची घोषणा केली. ट्वीट करत इंग्लंड क्रिकेट बोर्डानं याबाबतची माहिती दिली. इंग्लंडने ओली रॉबिन्सला ब्रेक दिलाय. मार्क वूड याचं कमबॅक झालेय. मार्क वूड याने हैदराबाद आणि राजकोट कसोटी सामने खेळले आहेत. राजकोट कसोटीमध्ये त्याने चार विकेटही घेतल्या होत्या. 


धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11- 



जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर





टीम इंडिया विजयी चौकार ठोकण्यास सज्ज 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे.  लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दरम्यान, बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.