IND vs ENG 4th Test Rishabh Pant: भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना (IND vs ENG 4th Test) खेळवण्यात येत आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant Injury) पायाला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. क्रिस वोक्सच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऋषभ पंतला दुखापत झाली. यानंतर त्याच्या पायातून रक्तही आले. त्याला उभे राहणंही कठीण झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून बाहेर नेण्यात आले. आता ऋषभ पंतच्या दुखपतीबाबत बीसीसीआयने अधिकृत अपडेट दिली आहे.
सामन्याच्या 68 व्या षटकात ऋषभ पंतला दुखापत झाली. पंतला ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारायचा होता, परंतु तो हा फुल टॉस बॉल पूर्णपणे चुकवल्याने चेंडू पंतच्या उजव्या बुटावर थेट लागला. पंतने त्याचा बूट काढला तेव्हा त्याला दिसले की थोडा रक्तस्त्रावही होत आहे. काही वेळाने त्याच्या पायावर सूज देखील दिसू लागली. तो चालण्यास असमर्थ होता, त्यानंतर मैदानावर रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला बाहेर घेऊन गेले.
बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल दिली अपडेट-
बीसीसीआयने ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतला उजव्या पायाला दुखापत झाली. त्याला स्कॅनसाठी स्टेडियममधून बाहेर नेण्यात आले. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऋषभ पंत पुन्हा फलंदाजीसाठी येणार की नाही?, चौथा कसोटी सामना खेळणार की नाही?, असे सवाल उपस्थित होत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडले?
इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. यानंतर केएल राहुल 46 धावांवर बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल 58 धावांवर बाद झाला. शुभमन गिलही अपयशी ठरला. बेन स्टोक्सने 12 धावांवर शुभमन गिलला बाद केले. संघात पुन्हा परतलेल्या साई सुदर्शनने 61 धावा केल्या. तर ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट झाला. रवींद्र जडेजा 19 आणि शार्दुल ठाकूर 19 धावांवर खेळत आहे.