England vs India 4th Test: लंडनमधील द ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत इंग्लिश कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. आजही रविचंद्रन अश्विनचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. कर्णधार विराट कोहलीने चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्याचबरोबर इंग्लिश संघही दोन बदलांसह मैदानात उतरला आहे.


ख्रिस वोक्स आणि ओली पोप इंग्लंड संघात परतले आहेत. जोस बटलर आणि सॅम कुर्रनच्या जागी या दोघांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा आज भारतीय संघाचा भाग नाहीत. त्यांच्या जागी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी मिळाली आहे.


IND vs ENG 4th Test : आजपासून चौथा कसोटी सामना, 50 वर्षांपासून ओव्हलमध्ये टीम इंडिया विजयापासून वंचित, दुष्काळ संपवणार?


टीम इंडियाची ओव्हलमध्ये अशी कामगिरी झाली आहे
लंडनमधील द ओव्हलमध्ये इंग्लिश संघाने नेहमीच टीम इंडियावर वर्चस्व राखले आहे. भारताला आतापर्यंत ओव्हलमध्ये फक्त एक विजय मिळाला आहे, जो 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळाला होता. भारताने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने पाच गमावले आहेत आणि सात सामने बरोबरीत सोडले आहेत.


दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन


भारताची प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


इंग्लैंड की प्लेइंग इलेवन- हसीब हमीद, रोरी बर्न्स, डेविड मलान, जो रूट (कप्तान), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ओली पोप, मोईन अली, क्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन, क्रेग ओवरटन और जेम्स एंडरसन.


50 वर्षांपासून ओव्हलमध्ये टीम इंडिया विजयापासून वंचित


इंग्लंड विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात मिळालेल्या लाजिवारण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज सुरु होणारा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लडं यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ओव्हलवर इंग्लंडच्या विरोधात टीम इंडियाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. अशात विराटसेनेसाठी या मैदनावर विजय मिळवणं एक मोठं आव्हान ठरणार आहे. 


भारताला आतापर्यंत ओव्हल मैदानावर केवळ एकच विजय मिळाला आहे. तो म्हणजे, 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळालेला विजय. भारताने या मैदानावर आतापर्यंत 13 कसोटी सामने खळले आहेत. ज्यापैकी 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सात सामने ड्रॉ झाले आहेत.