India vs England 4th Test Match: भारत आणि इंग्लंड (India vs England 4th Test Match) यांच्यातील मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. 300 पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर, दुसऱ्या डावात शून्य धावांवर भारताने दोन विकेट्स गमावल्या. तरीही, भारताने जोरदार पुनरागमन करत पराभव टाळला आणि सामना अनिर्णित ठेवला. 

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात एक रोमांचक सामना झाला. एकीकडे, या सामन्यात दोन दिवसांपूर्वी भारताचा पराभव निश्चित झाला होता आणि हा सामना हाताबाहेर जात असल्याचे दिसत होते, परंतु नंतर भारतीय कर्णधार शुभमन गिल, सलामीवीर फलंदाज केएल राहुल, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सामना फिरवला आणि अशक्य ते शक्य करुन दाखवले. भारताने चौथ्या कसोटीत नेमका पराभव कसा टाळला, जाणून घ्या...

1- भारत 358 धावांवर ऑलआउट

इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडिया 358 धावांपर्यंत पोहोचू शकली. पहिल्या डावात केएल राहुलनेही 46 धावांची शानदार खेळी केली.

2- इंग्लंडने मोठे लक्ष्य ठेवले

पहिल्या डावात इंग्लंडसाठी धावांचा पाठलाग करणे सोपे झाले. सलामीवीर बेन डकेटने 94 धावा करून चांगली सुरुवात केली आणि जॅक क्रॉलीने 84 धावा केल्या. त्यानंतर जो रूटच्या 150 धावा आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या 141 धावांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 669 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आणि तब्बल 311 धावांची आघाडी घेतली.

3- भारताचा पराभव निश्चित होता-

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पराभव निश्चित होता, जेव्हा टीम इंडिया फलंदाजीला आली आणि भारताला एकही धाव न देता दोन विकेट्स पडल्या. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाले. 

4- गिल-राहुलने संघाला वाचवले-

जयस्वाल आणि सुदर्शन बाद झाल्यानंतर, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भिंतीसारखे उभे राहिले आणि चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, इंग्लंडची आघाडी फक्त 137 धावांवर आली, परंतु इंग्लंडकडे भारताचे आठ बळी घेण्यासाठी संपूर्ण पाचवा दिवस शिल्लक होता आणि भारताला हा सामना अनिर्णित ठेवण्यासाठी कठोर फलंदाजी करावी लागली.

5- जडेजा-सुंदरने केला विजय निश्चित

सामन्याच्या पाचव्या दिवशी, केएल राहुल 90 धावांवर बाद झाला. त्याचवेळी, काहीवेळाने, इंग्लंडने शतक झळकावल्यानंतर 103 धावांवर गिलची विकेटही मिळवली. आता जेव्हा वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी आले तेव्हा दोघांनीही अशा प्रकारे फलंदाजी केली की इंग्लंडच्या गोलंदाजांचा पराभव झाला आणि टीम इंडियाने हा हरलेला सामना अनिर्णित ठेवला.

संबंधित बातमी:

Rishabh Pant Ruled OUT 5th Test : चौथा कसोटी सामना संपताच BCCIची घोषणा! ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, धाकड खेळाडूची निवड, कोण आहे तो?