IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात (4th Test) जो रुटने (Joe Root) शतकी खेळत इंग्लंडचा डाव सावरलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने सुरुवातीला विकेट्स गमावल्या. दरम्यान, जो रुट मैदानावर उतरला. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत असतानाच रुटने इंग्लंडचा डाव सावरलाय. त्याने 9 चौकारांच्या मदतीने 226 चेंडूमध्ये 106 धावा कुटल्या. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 302 धावा करत 7 विकेट्स गमावल्या आहेत. भारताकडून आकाश दीपने 3 विकेट्स पटकावत इंग्रजांना घाम फोडलाय. हा सामना रांचीतील मैदानावर खेळवला जात आहे. 


जो रुटची शतकी खेळी


पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाकडून जो रुटने शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजीला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून, झॅक क्राऊली 42 चेंडूमध्ये 42, बेन डकेट 21 चेंडूमध्ये 11, जो रुट 226 चेंडूमध्ये 106 (नाबाद) , जॉनी बेयरस्टो 35 चेंडूमध्ये 38, बेन स्टोक्सने 126 चेंडूमध्ये 47 धावा आणि ओली रॉबीनसनने 60 चेंडूमध्ये (नाबाद) 31 धावांचे योगदान दिले आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 7 विकेट्स गमावत 90 षटकात 302 धावा केल्या. जो रुटने या सामन्यात 31 वे शतक पूर्ण केले. रुट 106 धावांवर आणि रॉबिनसर 31 धावा करत नाबाद आहेत. पहिला सेशन पूर्णपणे भारताच्या नावावर राहिला होता. सुरुवातीच्या सेशनमध्येच टीम इंडियाने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला होता. तर दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडने वापसी केली. दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लंडने 86 धावा कुटल्या. तर तिसरे सेशनमध्ये दोन्ही संघाने तुल्यबळ कामगिरी केली. भारताने 2 विकेट्स पटकावल्या. तर रुटने शतक पूर्ण केले. 






आकाश दीपचा आक्रमक मारा 


भारताकडून, आकाश दीपने भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला घाम फोडलाय. त्याने 3 विकेट्स पटकावल्या आहेत. याशिवाय, मोहम्मद शमीने 2 तर रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट पटकावली. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत पहिल्या दिवशी 7 विकेट्स पटकावल्या आहेत. 










इतर महत्वाच्या बातम्या 


"मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला"; धोनीनंतर आता गंभीरवर भडकला स्टार क्रिकेटर, धमकी दिल्याचा केला आरोप