Ind vs Eng 4th T20I Score : पुण्यात टीम इंडियाने जिंकली टी-20 मालिका! पांड्या-दुबेनंतर हर्षित राणाने घातला धुमाकूळ, इंग्रजांचा 15 धावांनी पराभव
Ind vs Eng 4th T20I Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-20 सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 15 धावांनी जिंकला आणि आता एक सामना बाकी असताना मालिका 3-1 अशी जिंकली. या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली आणि हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या 53-53 धावांच्या खेळीने 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना एकेकाळी इंग्लंड सामन्यात वर्चस्व गाजवत दिसत होते, परंतु भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर गारद झाला. भारतीय संघाकडून रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
पुण्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकात हा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसून आले, पण हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक अर्धशतकांमुळे भारताने जोरदार पुनरागमन केले.
79 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला आहे. ब्रायडन कार्सने रिंकू सिंगला आऊट. तो 26 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. त्याला साथ देण्यासाठी शिवम दुबे क्रीजवर आहे.
आदिल रशीदने भारताला चौथा धक्का दिला आहे. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने अभिषेक शर्माला आऊट केले. तो 19 चेंडूत 29 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या. मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या साकिब महमूदने दुसऱ्या षटकात संजू सॅमसन (1), तिलक वर्मा (0) आणि सूर्यकुमार यादव (0) यांचे बळी घेतले. यानंतर रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये भागीदारी बहरत आहे. पहिल्या सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या 47/3 आहे.
भारताला पहिला धक्का साकिब महमूदने दिला आहे. त्याने संजू सॅमसनला आऊट केले. विकेटकीपर फलंदाज फक्त एक धाव काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
फिल साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाले की, टीम इंडियाने या सामन्यात तीन बदलांसह प्रवेश केला आहे. मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेलच्या जागी रिंकू सिंगला संधी मिळाली आहे तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
India vs England 4th T20I Cricket Score : पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 मध्ये शानदार विजय नोंदवून भारताने टी-20 मालिकाही जिंकली. चौथा टी-20 टीम इंडियाने 15 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 181 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो होते. त्याच्याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनीही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -