IND vs ENG 3rd T20 : राजकोटमध्ये टीम इंडियाचा पराभव; इंग्लंडचा 26 धावांनी विजय; 5 सामन्यांच्या मालिकेत उघडले खाते

IND vs ENG 3rd T20 Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला आहे.

किरण महानवर Last Updated: 28 Jan 2025 10:38 PM

पार्श्वभूमी

India vs England 3rd T20 Score Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय फलंदाजी खूपच खराब...More

IND vs ENG 3rd T20 Live : राजकोटमध्ये टीम इंडियाचा पराभव; इंग्लंडचा 26 धावांनी विजय

तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला आहे. बुधवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाहुण्या संघाने 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा करू शकला. अशाप्रकारे, इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात यश मिळवले. आता, दोन्ही संघ शुक्रवारी (31 जानेवारी) पुण्यात पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहे.