IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण केले. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. 


इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन आणि सॅम कुरान आणि ओली रॉबिन्सनने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचबरोबर रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक 19 धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेने 18 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा स्पर्श करू शकला नाही. याशिवाय अजिंक्य रहाणेने 18 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा गाढू शकला नाही.


त्याचवेळी जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली. या दोघांना ऑली रॉबिन्सन आणि सॅम कुर्रन यांनी चांगली साथ दिली. अँडरसनने आठ षटकांत पाच निर्धाव षटक टाकत फक्त सहा धावा देऊन तीन गडी बाद केलं. याशिवाय सॅम कुरनने 27 धावांत दोन आणि रॉबिन्सनने 16 धावांत दोन बळी घेतले.


तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर उभे राहू शकले नाहीत. कर्णधार विराट कोहलीचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध झाले.


भारताच्या डावात केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01, विराट कोहली 07, ऋषभ पंत 02, रवींद्र जडेजा 04, मोहम्मद शमी 00, जसप्रीत बुमराह 00 आणि मोहम्मद सिराज यांनी 03 धावा केल्या, तर इशांत शर्मा 08 धावांवर नाबाद राहिला.


इंग्लंडची यंदाची सर्वात मोठी सलामी भागीदारी 
इंग्लंडची धावसंख्या कोणत्याही विकेटशिवाय 93 धावा झाली आहे. (बातमी लिहीत होतो तोपर्यंत) इंग्लंडची यंदाची सर्वात मोठी सलामी भागीदारी आहे. रोरी बर्न्स 108 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावांवर खेळत आहे आणि हसीब हमीद 100 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने 40 धावा खेळत आहे. इंग्लंड पहिल्या डावात भारतापेक्षा 15 धावांनी पुढे गेला आहे.