IND Vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघातून बाहेर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात इंग्लंडसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑलराउंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. कर्णधार विराट कोहलीनं शार्दुल ठाकूरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल ठाकूरनं धमाकेदार खेळी करत आपलं योगदान दिलं होतं. शार्दुल ठाकूरनं सात विकेट्स घेतले होते. तसेच 67 धावांच्या जोरावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाला गवसणी घालण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तसेच, टीम इंडियाला ऑलराउंडर हार्दिक पांड्याची कमतरता भासत आहे. दुखापतीमुळं कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी हार्दिक पांड्या फिट नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी शार्दुलचा संघात समावेश होऊ शकतो.
विराट कोहली म्हणाला होता की, "शार्दुल ठाकूर निश्चितच टीम इंडियासाठी एक पर्याय आहे. शार्दुल गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल करणारा खेळाडू आहे. ब्रिस्बेनमध्ये केलेल्या खेळीसह आत्मविश्वास जागवतो. त्याच्यासारख्या खेळाडूमुळे कसोटी सामन्यात टीम इंडियाला आधार मिळू शकतो."
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी नॉटिंघम येथे होणार आहे. त्यानंतर लॉर्ड्सवर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान दुसरी कसोटी तर लीड्सवर 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान तिसरी कसोटी आणि द ओव्हलवर 2 ते 6 सप्टेंबर या काळात चौथी आणि अंतिम कसोटी मॅनचेस्टर येथे 10 सप्टेंबरपासून होणार आहे.
इंग्लंड दौर्यासाठी सुधारित भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृध्दिमान साहा (विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.
संभाव्य संघ :
टीम इंडियाचा संभाव्य संघ : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. (शार्दुल ठाकूरचा समावेश होण्याची शक्यता)
इंग्लंडचा संभाव्य संघ : रोरी बर्न्स, डोमिनिक सिबली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), डॅनियल लॉरेंस/जे लीच, जे बेयरस्टो, ओली पोप/जे लीच, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड, जेम्स एंडरसन