Abhishek Sharma IND vs ENG 1st T20I : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा (India vs England 1st T20I) 7 विकेट्सने पराभव केला. आता टीम इंडियाने  पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने भारतासमोर विजयासाठी फक्त 133 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ही धावसंख्या युवा भारतीय संघाने 12.5 षटकांत 3 गडी गमावून सहज गाठली. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 34 चेंडूत 79 धावा करून भारताच्या धावांचा पाठलाग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु या डावानंतरही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला नाही. त्यामुळे चाहते बोलत आहे की, अभिषेक शर्मावर अन्याय झाला. 




पहिल्या टी-20 मध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवणाऱ्या वरुण चक्रवर्तीला हा पुरस्कार मिळाला आहे. वरुण चक्रवर्तीने चार षटकांत फक्त 23 धावा देत 3 विकेट घेतले. ज्यामध्ये त्याने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर तसेच हॅरी ब्रुक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची शिकार केली. बटलरने इंग्लंडकडून सर्वाधिक 68 धावा केल्या.




सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो योग्य ठरला. ईडन गार्डन्सवर इंग्लंडची सुरुवात खराब झाली, त्यांनी तीन षटकांतच फिल साल्ट आणि बेन डकेट दोन्ही सलामीवीर गमावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार जोस बटलर व्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. बटलरने 44 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावा केल्या, त्याच्याशिवाय इतर कोणताही इंग्लिश फलंदाज 20 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही.


धावसंख्येचा पाठलाग करताना, भारताने संजू सॅमसन (26) आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीने शानदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनीही 4.3 षटकांत 41 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकला नाही. नंतर तिलक वर्मा मैदानात आला, त्याने आणि अभिषेकने काही वेळातच संघाला विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माने 34 चेंडूत 5 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 79 धावांची तुफानी खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 232.35 होता.


हे ही वाचा - 


Ind vs Eng : नितीश कुमार रेड्डीचा कॅच पाहिला नाही तर तुम्ही काय पाहिले... मैदानात सुपरमॅनसारखी हवेत उडी मारली अन्..., पाहा Video