Nitish Reddy Catch Ind vs Eng 1st T20 : कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध (India vs England, 1st T20I) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. इंग्लिश संघाला 132 धावांत गुंडाळल्यानंतर, भारतीय फलंदाजांनी केवळ 77 चेंडूत लक्ष्य गाठून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 79 धावांची शानदार खेळी करत इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण आधी भारताचा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने एक शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे.
नितीश रेड्डीने घेतला एक शानदार कॅच
भारताकडून वरुण चक्रवर्तीने 17 वे षटक टाकले. जोस बटलरने त्याच्या पहिल्याच चेंडूवर एक लांब षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने मोठा शॉट खेळला, पण भारतीय क्षेत्ररक्षक नितीश रेड्डी सावध होता, तो चेंडूकडे धावला आणि सुपरमॅनसारखी हवेत उडी मारली एक शानदार झेल घेतला. आता बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहिल्या टी-20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 132 धावा केल्या. इंग्लंडकडून जोस बटलरने अर्धशतक झळकावले. बटलर 44 चेंडूत 68 धावा करून आऊट झाला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. याशिवाय इंग्लंडचा कोणताही खेळाडू 20 चा आकडा ओलांडू शकला नाही. तर फक्त 2 खेळाडूंनी दुहेरी अंकाचा टप्पा ओलांडला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात, टीम इंडियाने 12.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. अभिषेक शर्माने 34 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 79 धावांची तुफानी खेळी केली. या काळात त्याने अंदाजे 233 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर संजू सॅमसनने 26 धावा केल्या. शेवटी, तिलक वर्मा 16 चेंडूत 19 धावा आणि हार्दिक पांड्या 3 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 2 विकेट घेतल्या. तर आदिल रशीदला यश मिळाले.
हे ही वाचा -