IND vs BAN Under-19 World Cup Quarter Final: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज (29 जानेवारी) भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी समोर आलीय. कोरोनामुळं संघाबाहेर गेलेले महत्वाचे खेळाडू संघात परतले आहे. आजच्या सामन्यात बागंलादेशला पराभूत करून भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य असेल.


अंडर-19 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, आता हे संपूर्ण खेळाडू कोरोनामुक्त झाले असून बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या एक दिवस अगोदर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यानं भारतीय अंडर-19 क्रिकेट संघातील कोरोनाबाधित खेळाडू आता बरे झाल्याची माहिती दिली.


2022 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास
भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.


2022 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशचा प्रवास
बांगलादेशचा बाद फेरीपर्यंतचा प्रवास भारतासारखा सोपा नव्हता. या सामन्यात इंग्लंडने त्याला आधीच पराभूत केले होते. बांगला संघाने नंतर गटात कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha