IND vs BAN, Test Probable 11 : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवार अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. पण अशातच भारत आणि बांगलादेशचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्याने या मालिकेत बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत...
एकीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाताला दुखापत झाल्यामुळे या मालिकेत नसल्याचं समोर येत आहे. त्यानंतर आता कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच बांगलादेश संघाला ही मोठा धक्का बसू शकतो. कारण संघाचा कर्णधार शाकिब अल हसनला दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हसनला शाकीब चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सरावासठी पोहोचला असता त्याला दुखापतीमुळे थेट रुग्णालयात नेण्यात आलं. विशेष म्हणजे त्याला अॅम्ब्युलन्समधून स्टेडियममधून नेण्यात आलं. संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शाकिबची दुखापत जास्त गंभीर नसल्याचं सांगण्यात आलं असून तो कसोटी मालिका खेळेल का? याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान शाकिब सध्यातरी संघात असल्यानं तो नक्कीच अंतिम 11 मध्ये असू शकतो. भारतात पुजारा, गिलचं पुनरागमन होत असून उनाडकटला संधी दिल्यामुळे तो नक्कीच अंतिम 11 मध्ये असेल. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी असू शकते पाहूया...
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - लोकेश राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, उमेश यादव
बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शाकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, लिटन दास, शरीफुल इस्माल, झाकीर हसन, महमुदुल हसन, राजूर रहमान, तस्किन अहमद.
कसं आहे कसोटी मालिकेचं वेळापत्रक?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.
हे देखील वाचा-