IND vs BAN, 1st Test : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका(IND vs BAN Test Series) उद्यापासून अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल् हसनला (Shakib Al Hasan) दुखापतीमुळे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दरम्यान त्याची दुखापत गंभीर असल्यास त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागू शकते, ज्यामुळे बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.


तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसू शकतो. संघाचा कर्णधार शाकिब अल हसनला दुखापतीनंतर (Shakib Al Hasan Injury) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सामन्यापूर्वी, शाकीब चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सरावासठी पोहोचला असता त्याला दुखापतीमुळे थेट रुग्णालयात नेण्यात आलं. विशेष म्हणजे त्याला अॅम्ब्युलन्समधून स्टेडियममधून नेण्यात आलं. दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डानं याबाबत माहिती देताना सांगितले की,'दुखापत जास्त गंभीर नाही, परंतु वाहतुकीचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने शाकिबला रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले आहे.'' दरम्यान कसोटी मालिकेत शाकिब खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता संघ व्यवस्थापनाने दिलेली नाही.


कसोटी मालिकेसाठी कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ -


केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.


बांगलादेश संघ -


शाकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.


हे देखील वाचा-