India vs Bangladesh T20: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. अर्शदीप सिंगने 3 विकेट्स पटकावल्या.


बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात (Ind vs Ban) भारताकडून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केले. पदार्पणाच्या या सामन्यात मयंक यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिलेच षटक निर्धाव टाकले. तसेच सामन्यात 1 विकेट्स देखील घेतली.  तर नितीश कुमार रेड्डीने 16 धावा केल्या.  सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या नावावरुन गदारोळ उडाल्याचं दिसून आलं.






नितीश रेड्डीच्या नावाशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. नितीश रेड्डी यांनी प्रथम गोलंदाजी करत 2 षटकात 17 धावा दिल्या मात्र त्यांना एकही बळी घेता आला नाही. फलंदाजीत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने 15 चेंडूत 16 नाबाद धावा केल्या. नितीशने दमदार षटकारही मारला, पण तो चर्चेत आला आहे कारण त्याच्या जर्सीवर नितीश नव्हे तर 'नितेश' असे लिहिले आहे. 




बीसीसीआयने मोठी चूक केली का?


भारतीय क्रिकेटपटूचे अधिकृत नाव नितीश आहे, परंतु जर्सीवर 'नितेश' लिहिलेले आहे ही बीसीसीआयच्या लॉजिस्टिक टीमने केलेली मोठी चूक असावी. सध्या Addidas कंपनी भारतीय क्रिकेट संघाचे किट आणि जर्सी बनवते आणि नितीशचे नाव 'नितेश' असे लिहिण्यात उत्पादक कंपनीचीही चूक आहे.


कोण आहे नितीश कुमार रेड्डी?


नितीश कुमार रेड्डीच्या जर्सीमध्ये चूक झाली असली तरी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो खूश असेल. नितीश रेड्डीने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 303 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. जर सनरायझर्स हैदराबादला नितीश कुमार रेड्डीला आयपीएल 2025 साठी संघात कायम ठेवायचे असेल तर फ्रँचायझीला किमान 11 कोटी रुपये द्यावे लागतील. याशिवाय हैदराबाद राईट टू मॅच (RTM) कार्डद्वारे नितीश कुमार रेड्डीला कायम ठेवू शकते.


पहिला टी-20 सामना कसा राहिला?


एकतर्फी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गड्यांनी सहज धुव्वा उडवला. या दमदार विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशला 19.5 षटकांत 127 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 11.5 षटकांमध्येच 3 बाद 132 धावा केल्या. जुलै 2024 पासून भारताचा हा सलग आठवा आंतरराष्ट्रीय टी-20 विजय ठरला.


संबंधित बातमी:


Mayank Yadav : मयंक यादवची पहिल्याच सामन्यात झापूक झुपूक बॉलिंग, 150च्या स्पीडने मारा, अनेक विक्रम नावावर