R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला आहे. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारतवासियांचा नाताळ सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात दोघांनी 71 धावांची विजयी भागीदारी केली. त्याचबरोबर त्यांच्या या भागीदारीमुळे एक मोठा विक्रमही त्यांनी केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे00.


खास विक्रम अय्यर-अश्विनच्या नावावर


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने भारतासाठी नाबाद 71 धावांची सामना जिंकवून देणारी भागिदारी केली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या क्रमांकासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ही जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. अश्विन आणि अय्यर यांनी कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांच्या रेकॉर्डला मागे टाकत हा खास विक्रम केला आहे. कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांनी 1985 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 70 धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर अमर सिंह आणि लाल सिंह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात त्याने 8व्या विकेटसाठी त्यांनी 74 धावांची भागीदारी केली.


चौथ्या डावात 8व्या विकेटसाठीची भारताकडून सर्वात मोठी भागीदारी


1932 - 74 धावा एल अमर सिंग आणि लाल सिंग विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स)


2022 - 71 धावा श्रेयस अय्यर आणि आर अश्विन विरुद्ध बांगलादेश (मीरपूर) 


1985 - 70 धावा कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)


भारताने मालिकाही जिंकली


भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.


हे देखील वाचा-