India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात गुरुवारी दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघाचा 188 धावांनी पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये पाहुणा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही दुखापतीतून सावरला नसल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यातही केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करेल. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठं पाहायचा? हे जाणून घेऊयात.
भारताची मालिकेत आघाडी
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 1-0 नं आघाडीवर आहे. भारतानं पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतानं दोन बाद 258 धावा करून डाव घोषित केला. दरम्यान, 513 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 324 धावांवर ढेपाळला.
कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22-26 डिसेंबरदरम्यान रोजी खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा बांगलादेशच्या ढाका येथील नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
बांगलादेशचा संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.
हे देखील वाचा-