Virat Kohli 15-year-old fan travels 58 km on cycle : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांची जगभरात कमी नाही. त्याला पाहण्यासाठी लांबून लोक येतात. असाच काहीसा प्रकार कानपूर कसोटीतही पाहायला मिळाला, जिथे विराट कोहलीला पाहण्यासाठी एका मुलाने 58 किलोमीटर अंतरावरून सायकलिंग करून कानपूरला आला.
खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती एका मुलाशी बोलत आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलाचे नाव कार्तिकेय सांगत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो की कोहलीला पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातील उन्नाव ते कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमपर्यंत 58 किलोमीटर सायकल चालवली आहे. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशात क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. असाच जोश 15 वर्षांच्या कार्तिकेयमध्येही पाहायला मिळाला. जिथे त्याने आपला आदर्श विराट कोहलीला भेटण्यासाठी 58 किलोमीटर सायकल चालवली. कार्तिकेयने सकाळी 4 वाजता सायकलवरून प्रवास सुरू केला आणि सकाळी 11 वाजता स्टेडियम गाठला. म्हणजे सुमारे 7 तास तो सायकल पँडल मारत आला. कार्तिकेय वेळेवर स्टेडियमवर पोहोचला पण पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ बंद करण्यात आला होता. कानपूरला जाण्यासाठी त्याच्या पालकांनीही परवानगी दिली होती. तो दहावीत शिकतो. कार्तिकेयची कोहलीबद्दलची आवड पाहून लोक हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत.
शुक्रवारी कानपूरमध्ये पावसाची 96% शक्यता होती. वादळाचीही 58% शक्यता होती. असंच काहीसं झालं. पावसामुळे खेळात व्यत्यय आला. अशा स्थितीत सामना नियोजित वेळेपूर्वी संपला. भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. बांगलादेश 35 षटकांत 107 धावांवर आहे. या काळात त्याने तीन विकेट गमावल्या आहेत. क्रीझवर मुशफिकर रहीम नाबाद 6 धावांवर तर मोमिनुल हक 40 धावांवर नाबाद आहे. भारतातर्फे आकाशदीपने दोन आणि अश्विनने एक विकेट घेतली.
हे ही वाचा -