IND vs AUS 3rd ODI : चेन्नई येथे बुधवारी रात्री (22 मार्च) झालेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा (Team India) 21 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) प्रथम फलंदाजी करताना 269 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 248 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातील पराभवासोबतच टीम इंडियाने मालिकाही गमावली. भारतीय संघाने ही तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली. भारतीय संघ घरच्या मैदानावर वनडे मालिकेत पराभूत झाल्याचं मागील 4 वर्षांत पहिल्यांदाच घडलं आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या पराभवामुळे टीम इंडियाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदापासून ते सूर्यकुमार यादवच्या सततच्या फ्लॉप फलंदाजीपर्यंत अनेक मीम्स बनवले जात आहेत. राहुल द्रविडही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. भारतीय चाहते टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीवरही मीम्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत आहेत. यातीलच काही खास मीम्स पाहू...
2019 नंतर पहिल्यांदाच गमावली मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना भारताने गमावला. 270 धावाचं लक्ष्य गाठताना 248 धावांवर भारत सर्वबाद झाल्यामुळे 21 धावांनी सामना भारताला गमवावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकातील सलग दुसरा सामना भारताने गमावल्यामुळे मालिकाही भारताने गमावली. विशेष म्हणजे 2019 नंतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर मालिका गमावली आहे. मागील चार वर्षात मालिका भारतानं घरच्या मैदानावर जिंकल्या असून दोन मालिका ड्राॅ देखील झाल्या आहेत.
हे देखील वाचा-