IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात कांगारूंनी भारताचा 21 धावांनी पराभव करत मालिका देखील जिंकली. विशेष म्हणजे भारतीय संघाने (Team india) चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावली आहे. याआधी 2019 मध्ये भारताने आपल्या भूमीवर एकदिवसीय मालिका गमावली होती. दरम्यान ही मालिक गमावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडू दडपणाखाली असल्याचं दिसून येत होतं. दरम्यान सामन्यात एक गोष्ट अशी घडली ज्यावेळी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) फिरकीपटू कुलदीप यादववर (Kuldeep Yadav) संतापल्याचं दिसून आलं. कुलदीपने रोहित शर्माला डीआरएस घ्यायला लावला. पण डीआरएस त्यांच्या बाजूने न लागल्याने शर्मा खूप नाराज झाला होता.


नेमकं झालं काय?


कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 39 वं षटक टाकण्यासाठी आला. यावेळी अॅश्टन एगर त्याच्या समोर होता. चायनामन गोलंदाज कुलदीपने अॅश्टनला गुगली टाकली. हा चेंडू त्याच्या बॅटवर आला नाही आणि जाऊन पॅडला लागला. कुलदीपने LBW चे अपील केले जे पंचांनी फेटाळले. त्यानंतर त्याने कर्णधार रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. रोहित तितका कॉन्फीडन्ट नव्हता. रोहित शर्मा विराट कोहलीशी देखील बोलताना दिसला. पण कुलदीपच्या बोलण्यावर त्याने डीआरएस घेतला. ज्यानंतर तो DRS वाया गेला आणि भारतानं रिव्ह्यूय गमावला. ज्यामुळे कुलदीप यादववर डीआरएस बिघडवल्याबद्दल रोहित चांगलाच संतापला होता.


पाहा VIDEO-






असा होता ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 


भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. टीम इंडियाने कसोटी मालिकेत कांगारूंचा 2-1 असा पराभव केला. इंदूरमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकली. आणि दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. तर अहमदाबादमध्ये खेळलेला चौथा सामना अनिर्णित राहिला. यानंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने पाहुण्यांचा 5 गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. तर चेन्नईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात कांगारूंनी भारताचा 21 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली.


हे देखील वाचा-