India vs Australia Toss Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) पहिल्या टी20 सामन्यांत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला आता महिन्याभरापेक्षा कमी काळ शिल्लक आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. ज्यामुळे आजच्या या सामन्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघानी आपआपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले आहेत. विश्वचषकात कोणाकोणाला संधी मिळणार? यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. असं असतानाही जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल, असं रोहितनं नाणेफेकीदरम्यान सांगितलं. तसंच ऋषभ पंत यालाही विश्रांती देत संघाबाहेर ठेवलं आहे. विशेष म्हणजे अनुभवी गोलंदाज उमेश यादव जवळपास 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्री टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. तसंच यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात टीम डेव्हीड फायनली पदार्पण करत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोस हेजलवुड, नथन एलिस.
चेसिंग करणं सोपं
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये सातवेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. ज्यामुळे आजही नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
हे देखील वाचा-