IND vs AUS ODI India Squad: मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल याच्याकडे नेतृत्व देण्यात आलेय. रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांना दोन वनडे सामन्यात आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे या वनडे मालिकेत आर. अश्विन याला प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे. दोन्ही संघाना खेळण्यासाठी अखेरचे तीन सामने असतील. त्यानंतर विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे.
आर. अश्विनला संधी -
अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वॉशिंगटन सुंदर आणि आर. अश्विन यांना संधी मिळाली आहे. अक्षर पटेलची दुखापत गंभीर असल्यास या दोघांपैकी एका खेळाडूला विश्वचषकाचे तिकिट मिळू शकते. आर अश्विनचा अनुभव पाहता टीम इंडिया त्याला संधी देऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विन कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
दोन सामन्यासाठी भारतीय संघ -
केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
KL Rahul (C & WK), Ravindra Jadeja (Vice-captain), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, Ishan Kishan (wicketkeeper), Shardul Thakur, Washington Sundar, R Ashwin, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -
आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.