IND vs AUS, LIVE Score : सामना रोमांचक स्थितीत, भारताचे पाच गडी तंबूत
India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.
झाम्पाची विकेट घेत सिराजनं आपली तिसरी विकेट पूर्ण केली आहे. अशारितीने 188 धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला आहे.
भारतीय संघ दमदार गोलंदाजी करत असून मॅक्सवेलची मोठी विकेट जाडेजानं घेतली असून सिन अबॉटही सिराजकर्वी बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 9 गडी तंबूत परतले आहेत.
शमीनं आणखी दोन विकेट्स घेत ग्रीन आणि स्टॉयनिसला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 184 धावांवर एकूण सात गडी तंबूत परतले आहेत.
Josh Inglis याला मोहम्मद शमी यानं त्रिफळाचित केलं आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 5 गडी आता बाद झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी लाबुशेनच्या रुपात तंबूत परतला आहे. कुलदीप यादवनं त्याला बाद केलं आहे.
पार्श्वभूमी
Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकाला सुरुवात होत आहे. आज सलामीचा वन-डे सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर सुरु होत आहे.नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. ही मालिका 2-1 अशी जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं. ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. वनडे मालिकेतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) हरवण्याचा प्रयत्न करेल. कांगारुंविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी तशी फार खास नव्हती. ऑस्ट्रेलियाने कडवी झुंज दिली असल्याने वनडे सामनेही रंगतदार नक्कीच होऊ शकतात. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सर्व एकदिवसीय सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास, टीम इंडियावर कांगारुंचे पारडे जड आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत 143 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले असून भारताने 53 सामने जिंकले आहेत. तर 10 एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागला नाही.
कसा आहे पिच रिपोर्ट?
सामना होणाऱ्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमची (Wankhede Cricket Stadium) खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) उच्च धावसंख्येसाठी ओळखली जाते. त्यामुळे फलंदाजीसाठी नंदनवन असणारी ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी फार घातक आहे. हे स्टेडियम देशातील सर्वात लहान मैदान आहे ज्यामुळे देखील गोलंदाजांना अधिक चौकार आणि षटकार खावे लागतात. वानखेडेमध्ये पहिल्या डावातील एकूण सरासरी 240 आहे, जी दुसऱ्या डावात 201 पर्यंत खाली घसरते. तसंच येथे खेळल्या गेलेल्या 27 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 13 प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 14 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे, नाणेफेक तितकी महत्त्वाची नसून दमदार खेळ करणारा संघच जिंकू शकतो.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक (2023)
सामने | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -