IND vs AUS World Cup 2023 Final: विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताच्या फलंदाजांना एकापाठोपाठ तंबूत पाठवले. त्यांनी भारताला मोठी भागिदारी करु दिली.  विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. भारताने सलामीला 47 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. रोहित शर्माचे अर्धशतक फक्त तीन धावांनी हुकले पण त्याची ही खेळी आपल्याला शुभ संकेत देऊ गेली. 


रोहित शर्माने 31 चेंडूमध्ये वादळी 47 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या छोटेखानी खेळीमध्ये तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. रोहित शर्मा विस्फोटक फलंदाजीनंतर बाद झाला, त्यानंतर स्टेडियममधील हजारो चाहत्यांचा आवाज शांत झाला. तिथे सन्नाटा पसरला होता. रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला, पण त्यामधूनही आपल्याला शूभ संकेत मिळाले आहे. 


योगायोग पुन्हा होणार का?


कर्णधार रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला, तो भारतासाठी शुभ संकेत मिळाले आहेत. रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात सेमीफायनलमध्येही 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. होती. त्यानंतर इतर फलंदाजांनी शानदार खेळी केली. त्यामुळे भारताने 397 धावा चोपल्या होत्या.यामध्ये विराट कोहलीने शतकाचे शतक ठोकले होते. भारताने हा सामना जिंकला होता. आजही रोहित शर्मा 47 धावांवर बाद झालाय. त्यामुळे आजही भारतीय संघ विजय मिळवेल, असा चाहत्यांना विश्वास आहे. पुन्हा तोच योगायोग जुळून येईल, असं प्रत्येक चाहत्यांचे म्हणणे आहे.


रोहितची आक्रमक सुरुवात, पण फलंदाजी ढेपाळली -


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने 31 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी केली. तीन धावांनी रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनेही विकेट फेकली. श्रेयस अय्यर याने तीन चेंडूत एका चौकाराच्या मदतीने चार धावा करता आल्या. 81 धावांत भारतीय संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सावरला.