IND Vs AUS Brisbane Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये दुखापतीचं सत्र सुरु असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे नाईलाजास्तव टीम इंडियामध्ये चार बदल करावे लागले. याच बदलांमुळेच स्टार गोलंदाज टी नटराजनला वनडे, टी20 नंतर ब्रिस्बेन कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. टी नटराजन भारताच्या वतीने कसोटी सामना खेळणारा 300 वा खेळाडू बनला आहे. तसेच एकाच दौऱ्यावेळी तीनही फॉर्मेटमध्ये म्हणजे, वनडे, टी20 आणि कसोटी सामन्यांत पदार्पण करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.


नटराजन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरही ब्रिस्बेन कसोटीमध्ये डेब्यू करत आहे. सुंदरलाही नेट बॉलर म्हणूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यात आलं होतं. आता नटराजन भारतासाठी कसोटी सामना खेळणारा 300वा खेळाडू आणि सुंदर 301वा खेळाडू ठरला आहे. अशातच भारतासाठी कसोटी सामना खेळणारा 100वा, 200वा कसोटी क्रिकेटर कोण होते, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.


सीके नायडू यांना मानलं जातं कसोटी सामना खेळाणारा पहिला खेळाडू


भारताने 1932-33 सीजनमध्ये आपला पहिला कसोटी सामना इंग्लंड विरोधात खेळला होता. त्या सीरिजमध्ये भारतीय संघाचे कर्णधार सीके नायडू होते. यामुळे भारतासाठी कसोटी सामना खेळणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान सीके नायडू यांना दिला जातो.





भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी सामने खेळणारा 100वा खेळाडू बबलू गुप्ते होते. मुंबईत राहणाऱ्या गुप्ते यांनी नॉरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघात कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यांनी टीम इंडियासाठी केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत.


भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी सामने खेळणाऱ्या 200 व्या खेळाडूंचं करिअर खरंच फार मोठं होतं. विकेटकीपर फलंदाज नयन मोंगिया यांनी 1994 मध्ये श्रीलंकेविरोधात लखनौमध्ये पदार्पण केलं होतं. तो भारतासाठी 44 कसोटी सामने खेळला आहे. मोंगियाने 24 च्या सरासरीने 1442 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या :