Australia vs India 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आज 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 4 सामन्यांनंतर 1-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियासाठी ही कसोटी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. मिचेल मार्शच्या जागी 31 वर्षीय स्टार अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा प्रथमच प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे ब्यू वेबस्टरला भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.






टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळत नाहीये. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. सिडनी कसोटीत कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकल्यानंतर हा मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहितच्या जागी शुभमन गिल तर आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. 






खराब फॉर्ममुळे रोहितने घेतला 'हा' निर्णय


रोहित शर्माला गेल्या 15 कसोटी डावांमध्ये 164 धावा करता आल्या आहेत. त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. या कालावधीत, रोहितचा डाव 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3 (मेलबर्न कसोटीचा पहिला डाव) आणि 9 (मेलबर्न कसोटीचा दुसरा डाव) धावा केल्या जात आहेत. रोहितने यावर्षी 14 कसोटी सामन्यांच्या 26 डावांमध्ये 24.76 च्या सरासरीने 619 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली.


भारतीय संघ : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलिया संघ : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.


हे ही वाचा -


Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?