IND vs AUS ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी 20 सामना उद्या होणार आहे. या टी 20 मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. 2018 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या मैदानात आमने सामने आले होते. तेव्हा भारत 4 धावांनी पराभूत झाला होता. मात्र, आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात मालिका विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारताकडे उद्याच्या सामन्यासह मालिका 3-1 अशी जिंकण्याची संधी आहे. 

Continues below advertisement

ऑस्ट्रेलियाचा संघ उद्याचा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. टीम इंडियाला ब्रिस्बेनवरील मॅच जिंकण्यासाठी मैदानाची स्थिती पाहता संघात बदल करावे लागण्याची शक्यता आहे.ब्रिस्बेनची वेगवान आऊटफील्ड आणि वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत पाहता संघात बदल होऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या सामन्यात पराभव करत भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया त्यांच्या संघात बदल करण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातंय. 

भारतीय संघात तीन बदलांची शक्यता

भारत मधल्या फळीला मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी देऊ शकतो. त्यासाठी जितेश शर्माला संघाबाहेर बसावं लागेल. जितेशनं दोन डावात 22 आणि 3 धावा केल्या आहेत. भारताला पाचव्या टी 20 सामन्यात विजय मिळवायचा असेल तर आशिया कपमध्ये ज्या फलंदाजी क्रमाचा वापर करण्यात आला होता तो करावा लागेल. त्यामध्ये सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर, तिलक वर्मा  चौथ्या स्थानावर तर संजू सॅमसन पाचव्या स्थानावर फलंदाजीला आला होता. 

Continues below advertisement

शिवम दुबेच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी मिळू शकते. शिवम दुबे बाहेर गेल्यास वॉशिंग्टन सुंदर किंवा रिंकू सिंगला संघात स्थान मिळू शकतं. रिंकू सिंग या मालिकेत एकाही मॅछमध्ये खेळला नाही.ब्रिस्बेन मध्ये तीन फिरकी गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं भारतीय संघ जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा या तिघांना संधी देऊ शकतो. तर, फिरकी गोलंदाजी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल. 

भारताचा संभाव्य संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षित राणा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती 

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ: मिशेल मार्श (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर),टिम डेविड, मिशेल ओवन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, जेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, एडम झम्पा