Mohammed Shami Hasin Jahan : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हसीन जहाँने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून पोटगी (Maintenance Amount) वाढवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मोहम्मद शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे.

Continues below advertisement


4 लाख रुपये पुरत नाहीय, हसीन जहाँची मोहम्मद शमीकडे मोठी मागणी


हसीन जहाँने आपल्या याचिकेत कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये तिला दरमहा 1.5 लाख रुपये आणि मुलीच्या देखभालीसाठी 2.5 लाख रुपये गुजारा भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते, म्हणजे आता हसीन जहाँ मोहम्मद शमीकडे 4 लाख रुपये घेते. तिचे म्हणणे आहे की ही रक्कम तिच्या आणि मुलीच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे तिने सुप्रीम कोर्टाकडे ही रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे.


4 आठवड्यात उत्तर दे अन्यथा..., कोर्टात काय काय घडलं?


सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात शमी आणि राज्य सरकारला चार आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच पुढील सुनावणी होणार आहे. एएनआयच्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तोंडी निरीक्षण केले की सध्या देण्यात आलेली अंतरिम गुजारा भत्ता रक्कम बर्‍यापैकी योग्य आहे. पण, दोन्ही पक्षांचे उत्तर आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.




2018 पासून मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात वाद सुरू


मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद 2018 पासून सुरू आहे. हसीन जहाँने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून पुढील सुनावणीत दोन्ही पक्षांना आपले उत्तर सादर करावे लागणार आहे.


उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय कुमार मुखर्जी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “हसीन जहाँला दरमहा 1,50,000 रुपये आणि त्यांच्या मुलीला 2,50,000 रुपये इतकी रक्कम मिळणे उचित आहे. ही रक्कम प्रकरण निकाली लागेपर्यंत त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरेल.” तसेच न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, “मुलीच्या शिक्षणासाठी किंवा इतर खर्चासाठी शमी इच्छेनुसार या रकमेव्यतिरिक्तही मदत करू शकतो.”


हसीन जहाँ काय म्हणाली? 


निर्णयानंतर हसीन जहाँ म्हणाली की, “लग्नाआधी मी मॉडेलिंग करत होते, पण शमीने मला सगळं सोडून गृहिणी व्हायला भाग पाडलं. मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते म्हणून त्याचं म्हणणं ऐकलं. पण आता माझ्याकडे स्वतःचं उत्पन्न नाही. आमच्या जगण्याची सर्व जबाबदारी त्याच्यावरच आहे.”


तिने शमीवर तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला आणि पुढे म्हणाली, “तो ना आपल्या मुलीचं सुख पाहतो, ना तिचं भविष्य. मला उद्ध्वस्त करण्याची त्याची हट्टाग्रहाची वृत्ती त्याने सोडायला हवी. मी न्यायाच्या मार्गावर आहे, आणि तो अन्यायाच्या मार्गावर चालला आहे.”


हे ही वाचा -


Ind vs Pak : पाऊस आला अन् सामना फिरला! भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवलं, 2 धावांनी मिळवला विजय