Virat Kohli in IND vs AUS 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND vs AUS 4th Test) विराट कोहलीने (Virat Koh li) शतक ठोकल, विशेष म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर त्याने ही कामगिरी केली आहे. मागील तीन वर्षांपासून विराट कोहलीचा फॉर्म प्रत्येक फॉरमॅटमध्ये खराब आहे, मात्र गेल्या काही महिन्यांत त्याने सलग काही शतकं झळकावून पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच टी20 आणि वन-डे मध्ये त्याने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. याचनुसार सध्याच्या कसोटी मालिकेतही विराटचं पुनरागमन अपेक्षित होतं, पण पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये तसे होऊ शकले नाही.


मात्र, अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराटने अखेर कसोटी शतकाची प्रतीक्षा संपवली. विराट कोहलीने अतिशय लढाऊ खेळी खेळत अवघ्या 5 चौकारांच्या मदतीने आपले सर्वोत्तम शतक पूर्ण केले आणि भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. विराटने शतक पूर्ण करताच त्याचे नाव ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम (GOAT) सोबत सोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. त्याच्या शतकावर चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, विराट कोहली आता पुन्हा जागतिक क्रिकेटवर राज्य करण्यासाठी आला आहे. त्याचवेळी काही चाहते विराट कोहलीचे शतक पूर्ण केल्यानंतर टीव्हीवर त्याची पूजा करताना काहीजण दिसत आहेत. यातील काही खास मीम्स पाहू...






















1205 दिवसानंतर विराटचं कसोटीत शतक


विराट कोहली याने तब्बल 1205 दिवसानंतर कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे.


हे देखील वाचा-