India Playing 11 4th Test Vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. मेलबर्नमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. शनिवारी संघातील खेळाडूंनी जोरदार सराव केला आणि रविवारीही हाच क्रम कायम राहिला. मात्र रविवारी सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. फलंदाजीच्या सरावात रोहितला गुडघ्याला दुखापत झाली. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. येथे जाणून घ्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात.
भारतीय संघाने 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात विजयाने केली. मात्र, कांगारूंनी पुढची कसोटी 10 गडी राखून जिंकली आणि जोरदार पलटवार केला. त्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता मेलबर्नमध्ये दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील.
टीम इंडियामध्ये होऊ शकतात मोठे बदल
मेलबर्नमध्ये टीम इंडिया दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. मेलबर्नमध्ये भारताने शेवटचा कसोटी सामना जिंकला होता, तेव्हाही प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला होता. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच रणनीतीची पुनरावृत्ती करू शकतो. अशा स्थितीत रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
मोहम्मद सिराज बाहेर होणार का?
टीम इंडियाला दोन फिरकीपटूंसोबत जायचे असेल, तर मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांच्यातील एका वेगवान गोलंदाजाला वगळावे लागेल. अशा स्थितीत सिराजच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण या दौऱ्यावर तो अद्याप आपल्या जुन्या लयीत दिसलेला नाही. याशिवाय शुबमन गिलवरही पत्ता कट येऊ शकतो. गिलला बऱ्याच दिवसांपासून कसोटीत मोठी खेळी खेळता आलेली नाही.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -