IND vs AUS 4th Test Day 4 Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया  (IND vs AUS) यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामन्यातील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीननं यावेळी शतक ठोकलं. त्यानंतर भारतानं शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट  धावांकोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली आहे. यावेळी कोहलीचं जवळपास 3 वर्षानंतर ठोकलेलं शतक खास ठरलं असून आता ऑस्ट्रेलिया आपला दुसरा डाव खेळण्यास सुरुवात करणार आहे.


सामन्यात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं फलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांनी खेळपट्टीवर चांगलीच फलंदाजी केल्याचं पाहायाला मिळालं. उस्मान ख्वाजा याने 180 धावांची संयमी खेळी केली. उस्मान ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. उस्मान ख्वाजाशिवाय कॅमरुन ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ग्रीन याने 18 चौकार लगावले. त्याशिवाय मर्फीने  34 धावांची निर्णायाक खेळी केली. तर ट्रविस हेड 32, स्मिथ 38 यांनीही मोलाचं योगदान दिले. उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांची द्विशतकी भागिदारी हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.  भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. अश्विन याने जवळपास 48 षटकं गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 15 षटके निर्धाव टाकली. त्याशिवाय मोहम्मद शामी याने दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.


शुभमन-विराटचं शतकं



ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर भारताने फलंदाजीला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली पण तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर रोहित शर्मा 35 धावा करुन बाद झाला. मग पुजारा गिलने चांगली भागिदारी केली. पण पुजारा 42 धावा करुन बाद झाला.मग गिलनं शतक पूर्ण केलं 128 धावांवर तो बाद झाल्यावर कोहली संयमी खेळी करत होता. जाडेजासोबत त्यानं चांगली पार्टनरशिप केली. 28 धावांवर जाडेजा बाद झाला. मग श्रीकर भरत 44 रनांवर तंबूत परतल्यावर अक्षर पटेलंन दमदार अशी 79 धावांची खेळी केली. त्यानंतर अश्विन 7 उमेश यादव 0 धावांवर बाद झाल्यावर अखेर कोहली 186 रनांवर बाद झाला. दुखापतीमुळे श्रेय अय्यर फलंदाजी करु शकला नाही. ज्यामुळे भारतानं 571 धावा केल्या असून आता ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत आहे.



हे देखील वाचा-