IND vs AUS 3rd Test Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे. तर या महत्त्वाच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा तिसरा कसोटी सामना (India vs Australia 3rd Test) आज अर्थात, 1 मार्चपासून सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
केएल राहुलच्य जागी शुभमननला संधी मिळणार?
या सामन्यात भारत अधिक बदल करण्याची शक्यता नाही, कारण सध्या भारताचा खेळ चांगला होत आहे. मात्र सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) सतत फ्लॉप कामगिरी करत असल्याने त्याला वगळलं जाऊ शकतं. नुकत्याच झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात तुफान फॉर्म दाखवलेल्या शुभमन गिलला (Shubhman Gill) सलामीची संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलने मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये केवळ 12.67 च्या सरासरीने 38 धावा केल्या आहेत.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-