Australia vs India, 3rd Test day-2 Stumps Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया बॅकफूटवर दिसत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावर परिणाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी केली आणि संपूर्ण दुसऱ्या दिवशी भारतावर वरचढ दिसली. भारताला आज केवळ सात विकेट्स घेता आल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 405/7 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी, जसप्रीत बुमराहने भारताची प्रतिष्ठा वाचवण्याचे काम केले.
बुमराहने लाज राखली
दुसऱ्या दिवशी एकूण 10 धावांची भर पडल्याने बुमराहने दोन्ही ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एवढी शानदार सुरुवात करूनही भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा उठवता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाला डाव सांभाळण्याची संधी दिली. ऑस्ट्रेलियानेही 75 धावांवर तिसरी विकेट गमावली, पण येथेही भारतीय गोलंदाज काही करू शकले नाहीत.
कर्णधार रोहित शर्मानेही क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बदलण्यात अनेक चुका केल्या, त्यामुळे ट्रॅव्हिस हेडने पुन्हा एकदा शतक ठोकले. क्षेत्ररक्षणात रोहितने हेडचा कॅचही सोडला. हेडने 152 धावा आणि स्टीव्ह स्मिथने 101 धावा केल्या आणि चौथ्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली.
बुमराहला पुन्हा एकदा दिली पुनरागमनाची संधी
ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडणार नाहीत असे वाटत असतानाच बुमराहने पुनरागमन करत स्मिथला आऊट केले. यानंतर त्याने मिचेल मार्शलाही स्लिपमध्ये झेलबाद केले. शेवटी बुमराहने हेडची शिकार केली. 11 धावांत तीन बळी घेत बुमराहने आपले पाच विकेट पूर्ण केले आणि भारताला पुनरागमनाची उत्तम संधी दिली.
एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेटवर 316 धावा होती, पण त्यानंतर बुमराहने पंजा उघडला. मात्र, 327 धावांवर 6 विकेट पडल्यानंतर ॲलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स यांच्यात 58 धावांची भागीदारी केली. कमिन्स 20 धावा करून बाद झाला. सिराजने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरी एका टोकाकडून वेगाने धावा काढत आहे. तो 47 चेंडूत 45 धावा करून नाबाद आहे. त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि एक षटकार आला. त्याने मिचेल स्टार्कसोबत 20 धावांची नाबाद भागीदारीही केली
जसप्रीत बुमराहने भारतासाठी पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. बुमराहने 72 धावांत पाच विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने दुसऱ्यांदा पंजा उघडला आहेत. याशिवाय मोहम्मद सिराजने एक आणि नितीश कुमार रेड्डीने एक विकेट घेतली.
हे ही वाचा -