India vs Australia 3rd Test Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीला आता तीन दिवस झाले आहेत. पण आज तिसऱ्या दिवशी पावसाचा लपंडाव पाहिला मिळाला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे जवळपास दोन सत्रांचा खेळ खराब झाला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने 445 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने प्रत्युत्तरात 4 विकेट गमावून 51 धावा केल्या आहेत. खेळ संपेपर्यंत भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या 394 धावांनी मागे आहे.
भारताला डावाच्या सुरुवातीलाच बसला धक्का
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या धावसंख्येत 40 धावांची भर घातली आणि त्यांचा डाव 445 धावांवर संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर भारताचा डाव सुरू झाला आणि दुसऱ्या चेंडूवरच भारताने यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. यानंतर शुबमन गिलही डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि या दोन्ही विकेट मिचेल स्टार्कने घेतल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीही आऊच झाला.
कोहलीची विकेट पडताच पुन्हा एकदा पाऊस परतला आणि त्यानंतर पंचांनी लंचची घोषणा केली. उपाहारानंतर सामना सुरू झाला आणि केवळ सात चेंडू टाकल्यावर पाऊस आला. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 3.5 षटकांच्या गोलंदाजीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली.
नंतर सामना सुरू होताच भारताने चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतची विकेट गमावली. पंत बाद झाल्यानंतर परत पाऊस आला. या ब्रेक दरम्यान पंचांनी चहापानाची वेळ घोषित केली. यावेळी दोन तासांहून अधिक काळ खेळ थांबवून नंतर सामना सुरू करण्यात आला. 2.5 षटकाचा खेळ होताच परत पाऊस आला आणि यावेळी थोड्या प्रतीक्षेनंतर पंचानी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला.
हे ही वाचा -