Continues below advertisement

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टी 20 मॅच उद्या होणार आहे. ही मॅच होबार्टमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे. पहिला टी 20 सामना पावसामुळं रद्द झाला होता. तर, दुसऱ्या टी 20 मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 नं पुढं आहे. तिसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवून भारताला मालिकेत बरोबरी करावी लागेल. भारताच्या टीममध्ये काही बदल केले जाऊ शकतात.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या टीममध्ये अर्शदीप सिंगला संधी मिळाली नव्हती. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 मॅचमध्ये 101 विकेट अर्शदीप सिंगनं घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत अर्शदीप सिंगची कामगिरी सर्वसाधारण होती. त्यामुळं तिसऱ्या वनडेत अर्शदीपला संधी देण्यात आली नव्हती. हर्षित राणा संघात असला तरी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा विचार करता अर्शदीप सिंग संघात असणं आवश्यक आहे .

Continues below advertisement

भारताला दुसऱ्या टी 20 मध्ये तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव जाणवली. दुसऱ्या टी 20 मध्ये कुलदीप यादवनं दोन विकेट घेतल्या मात्र, मॅच भारताच्या हातून निसटली होती. कुलदीप यादवनं 3.2 ओव्हरमध्ये 45 धावा दिल्या होत्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कुलदीप यादवच्या गोलंदाजीची धुलाई केली होती. वरुण चक्रवर्तीनं 4 ओव्हरमध्ये 2 विकेट घेत 23 धावा दिल्या होत्या. वरुण चक्रवर्ती टी 20 क्रिकेटमधील नंबर 1 फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळं वरुण चक्रवर्तीला संधी मिळेल.

फलंदाजांवर मोठी जबाबदारी

भारताचे फलंदाज दुसऱ्या टी 20 मध्ये अपयशी ठरले आहेत. केवळ अभिषेक शर्मानं दुसऱ्या टी 20 मध्ये चांगली फलंदाजी केली होती. अभिषेक शर्मानं 68 धावा तर हर्षित राणानं 35 धावा केल्या होत्या. तर, इतर 9 खेळाडूंनी केवळ 19 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव, सुभमन गिल, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, तिलक वर्मा यांना राहिलेल्या तीन मॅचमध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल.

तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा, अर्शदिप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती