IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2023 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (IND vs AUS 2nd Test) दिल्लीत खेळवला जात आहे. ही कसोटी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जात असून नागपूर सामन्याप्रमाणेच दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने (team australia) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 21 धावांवर शून्य बाद अशा स्थितीत असून भारत 242 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने सर्वाधिक 81 धावा केल्या असून त्याचं शतक हुकवण्यात केएल राहुलचा मोठा हात होता. त्याने ख्वाजा याला अप्रतिम झेल पकडत बाद केलं आहे. या कॅचची क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा रंगत आहे.


केएल राहुलने टिपला शानदार झेल 


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने केएल राहुलच्या या शानदार कॅचचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहण्याआधी या कॅचबद्दल थोडं जाणून घेऊ... ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आज हवी तशी खास कामगिरी करु शकले नाहीत. 263 धावांवर त्यांचा संघ सर्वबाद झाला. दरम्यान त्यांच्याकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. एकावेळी ऑस्ट्रेलिया एक मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना भारताचा स्टार खेळाडू जाडेजाने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर तंबूत धाडलं. यावेळी केएल राहुलनं एक अप्रतिम झेल यावेळी पकडला. 


पाहा VIDEO-






 


उस्मानचं शतक हुकलं


ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकीकडे बाद होत असताना उस्मानने डाव सावरला होता. तो 81 धावांवर फलंदाजी करत होता आणि हळूहळू शतकाकडे वाटचाल करत होता. पण सामन्याच्या 46 व्या षटकात, उस्मानने रिव्हर्स स्वीप खेळत जाडेजाचा चेंडू पॉइंटच्या दिशेने वळवला, परंतु त्याचा शॉट मिड-ऑफला उभ्या असलेल्या केएल राहुलने त्याच्या उजव्या बाजूने फुल डायव्ह मारत एका हाताने झेल घेतला. केएल राहुलचा हा झेल पाहून उस्मान ख्वाजा स्वत:ही थक्क झाला, पण त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याचे शतक हुकले.


हे देखील वाचा-