IND vs AUS, Match Highlights : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अप्रतिम अशी फलंदाजी करत 209 धावांचं लक्ष्य सहज गाठलं आहे. ज्यामुळे भारत पहिल्याच सामन्यात 4 विकेट्सनी पराभूत झाला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते, पण कांगारुंनी 4 चेंडू आणि 4 विकेट्स राखून सामना जिंकला आहे. 






सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले.


कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक, वेड-स्मिथची महत्त्वपूर्ण खेळी


ऑस्ट्रेलियाचा संघ 209 धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आला असता त्यांची सुरुवातही चांगली झाली. पण 39 धावांवर आरॉन फिंच (22) बाद झाला. पण त्यानंतर कॅमरुननं स्मिथसोबत धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली. आपलं पहिलं वहिलं आतंरराष्ट्रीय टी20 अर्धशतक झळकावत ग्रीनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. 61 धावा करुन तो बाद झाला, स्मिथही 35 धावा करुन बाद झाला. पण मॅथ्यू वेडने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोन धावा शिल्लक असताना वेड बाद झाला, पण कमिन्सने स्ट्राईकवर येत चौकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-