Wankhede Stadium Stats: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी झालेली टी-20 मालिका टीम इंडियाने खिशात घातली असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही (Border Gavaskar Trophy) टीम इंडियाने जिंकली आहे. त्यामुळे आता वनडे सामन्यांची मालिका (IND vs AUS 1st ODI) टीम इंडिया जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वानखेडेवर (Wankhede Stadium) कांगारुंचा पराभव करणं टीम इंडियासाठी सोपं नसणार आहे. मागे वळून पाहिलं तर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरोधात यापूर्वी चार वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने (Team Australia) तीन वेळा बाजी मारली आहे. 


वानखेडेवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ फेब्रुवारी 1996 मध्ये पहिल्यांदा भिडले होते. या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव केला होता. यानंतर नोव्हेंबर 2003 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात कांगारु संघाने टीम इंडियाचा 77 धावांनी पराभव केला. ऑक्टोबर 2007 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडेवर विजय मिळवू शकला. त्यानंतर टीम इंडियाने हा सामना 2 विकेट्सनी जिंकला. यानंतर अखेरच्या सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव केला होता.


वानखेडेमध्ये टीम इंडियाचा विक्रम


वानखेडेच्या मैदानावर टीम इंडियाचा एकूण रेकॉर्डही सरासरी राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघ या मैदानावर एकूण 19 एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये 10 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत आणि 9 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजेच, या मैदानावर भारताची विजयाची टक्केवारी 52.63 इतकी आहे.


पहिल्या वनडेची मदार पांड्याच्या खांद्यावर 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थित राहणार आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो या सामन्याचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियाची मदार सांभाळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करण्याची हार्दिकची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्याने T20 मध्ये कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने 11 पैकी 8 टी-20 मध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


WTC Final : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, कशी आहे WTC गुणतालिका? वाचा सविस्तर