Team India for West Indies Tour :  इंग्लंडविरुद्धचे सामने आटोपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने खेळवले जाणार असून यामध्ये एकदिवसीय आणि टी20 सामने असणार आहेत. यासाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय टी20 संघ नुकताच जाहीर केला. ज्यामध्ये भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (KL Rahul and Kuldeep yadav) संघात परतले आहेत. दोघांची नावही संघात असली तरी ते खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 


कारण या दोघांनाही दुखापतीमुळे मागील काही सामने संघात खेळता आलेलं नाही. कुलदीप तर बऱ्याच महिन्यांपासून संघात नसून राहुल आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला. सध्या हे दोघेही रिकव्हर होत असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दोघेही पूर्णपणे फिट असतील तर त्यांना संघात स्थान मिळेल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.






 


कसा आहे वेस्ट इंडिजविरुद्ध भारती संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.


हे देखील वाचा-