Ashes Test Series 2021: अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लडंचा धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 आघाडी घेतली. मात्र, एडिलेडमधील दुसऱ्या अॅशेस कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केली. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं पहिल्याच दिवसाच्या आठव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा संघाला पहिला झटका दिलाय. स्टुअर्टच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्क हॅरिस झेलबाद झाला. या विकेट्स संपूर्ण श्रेय जॉस बटलरला जातंय. चार फूट दूर जाणारा चेंडू जॉस बटलरनं एका हातानं पकडून मार्क हॅरिसला माघारी धाडलंय. जॉस बटलर झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी डे नाईट खेळवला जात आहे. या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड आठवं षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी मार्कस हॅरिस फलंदाजी करीत होता. ब्रॉडनं षटकातील तिसरा चेंडू राऊंड द विकेटवरून टाकला. या चेंडूवर हॅरिसनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चेंडू लेग स्लिप जात असताना बटलरनं चार फूट दूर झेप घेऊन एका हातानं झेल घेतला.  क्रिकेट सामन्यात असे सुरेख झेप क्वचितच पाहायला मिळतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच जॉस बटलर याच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

स्टीव्ह स्मिथकडं दुसऱ्या कसोटीचं नेतृत्वदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर या डे नाईट कसोटीतून वगळण्यात आले आहे. एडिलेड सुरु असेलल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करीत आहे. स्मिथ कसोटी 2018 नंतर संघाचं नेतृत्व करत आहे. 2018 मध्ये जेव्हा बॉल टॅम्परिंगची घटना घडली तेव्हा केपटाऊन कसोटीत त्याने कांगारू संघाचं अखेरचं नेतृत्व केलं होतं. ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलिया संघडेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, झ्ये रिचर्डसन, नॅथन लियॉन.

इंग्लंडचा संघरॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.